
आम्ही विनामूल्य Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं कृती | स्वाध्याय | प्रश्नोत्तर Pdf स्वरूपात प्रतुत करून देत आहोत. आपण जर Class 10th Marathi Aksharbharti Solutions | Digest च्या शोधात आहात तर तुह्मी योग्य ठीकानि आला आहात. आमच्या तज्ञ शिक्षकांच्या टीमने या पाठचा अभ्यास केला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना या पाठचा सारांश देण्यात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी नोट्स तयार केल्या आहेत. आम्ही तुम्हाला खात्री देतो की आमच्या पीडीएफ फाइल्स वापरून तुम्ही अधिक गुण मिळवू शकता. आम्ही तुम्हाला सांगू या की या प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या तज्ञ शिक्षक संघाने तयार केली आहेत. येथे तुम्हाला तीन पीडीएफ फाइल्स मिळतील, त्यापैकी पहिल्या पीडीएफ फाइल्समध्ये पाठ्यपुस्तकातील प्रश्नांची उत्तरे आहेत तर दुसऱ्या पीडीएफ फाइल्समध्ये तुम्हाला सरावांसाठी अतिरिक्त अतिरिक्त प्रश्न मिळतील. तिसर्या आणि शेवटच्या पीडीएफ फायलींमध्ये, तुम्हाला या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास मिळेल.
तुम्हाला माग्दर्शिका/गाईडची काळजी करण्याची गरज नाही कारण आमची पीडीएफ सोल्यूशन्स वापरल्यानंतर तुम्हाला त्यांची गरज भासणार नाही. या पोस्टच्या शेवटी तुम्हाला सर्व पीडीएफ फाइल्स मिळतील, म्हणून आम्ही तुम्हाला संपूर्ण लेख वाचण्याची विनंती करू इच्छितो.
Board | Class | Chapter |
Maharashtra state Board | 10th | Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं |
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं questions answers in pdf format:
Table of Contents
Questions and answers of class 10th Chapter 12.1 Jagan Cactusch in Pdf
तुम्ही ज्याची वाट पाहत होता ते येथे तुम्हाला मिळेल. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी, आता तुम्हाला महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या इयता 10 वी मराठी अक्षरभारती विषयातील पाठ 12.1 “जगणं कॅक्टसचं “ च्या pdf फाइल्स खाली सापडतील.
खाली तुम्ही PDF फाइल पाहू शकता जी डाउनलोड केली जाऊ शकते परंतु पुढे जाण्यापूर्वी, कृपया खाली दिलेल्या आमच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा.
Pdf file कशी डाऊनलोड करावी ?
खाली आपणास आमची pdf file दिसत आहे त्या खालील मेनू बटन देखील दिसत असेल. पुढील पेज बघण्यासाठी आपणास next बटन वर क्लिक करावे लागेल. अश्या प्रकारे आपण सर्व pdf file मधील प्रश्नोत्तरे बघू शकाल.
जर आपणांस खालील pdf फाईल डाऊनलोड करायची असेल तर “Download Now“ या बटनावर क्लिक करावे लागेल. बटांवर क्लिक केल्या नंतर 15 सेकंदाचा वेळ थांबा. त्यानंतर आपणास प्रश्नोताराची pdf file डाऊनलोड करण्यास मिळेल.
Chapter-12.1-जगणं-कॅक्टसचंDo you want to download above file In pdf ?
Pdf फाईल डाऊनलोड करा
Download our Other Important PDF files ↴
Chapter 11 जंगल डायरी - Text book Exercise
Chapter 11 जंगल डायरी - Additional Extra Exercise:
Chapter 11 जंगल डायरी - Entire Exercise:
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं: Pdf Download
Download Marathi class 10th Chapter 12.1 Jagan Cactusch pdf file
कधी- कधी काही तांत्रिक अडचणीचा विचार करता वरील दिलेल्या फाइल्स डाऊनलोड करत असताना काही अडचणी येवू शकतात.
आपणस जर वरील दिलेल्या Pdf फाइल्स डाऊनलोड करण्यास काही अडचणी येत असतील तर आपण खाली रकान्यात दिलेल्या Download बटनाला क्लिक करून मजकुराह डाऊनलोड करू शकता.
पाठाचे नाव | मजकूर | डाऊनलोड |
Marathi Aksharbharti Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं | Text book Exercise | Download Download |
Marathi Aksharbharti Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं | Additional Extra Exercise | Download Download |
Marathi Aksharbharti Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं | Entire Exercise | Download Download |
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं: Notes
Class 10th Marathi Chapter 12.1 Jagan cactusch notes:
आपण इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 12.1 " जगणं कॅक्टसचं " अध्ययन करत असताना, आपण पाहू शकतो की या पाठच्या मध्यंतरी बरेच प्रश्न विचारले जातात आणि विद्यार्थ्यांनी त्यांची उत्तरे देणे अपेक्षित असते. काही विद्यार्थ्यांना उत्तर देताना काही समस्या येऊ शकतात, परंतु आम्ही तुम्हाला वचन देतो की आमच्या उत्तराचे पुनरावलोकन केल्यानंतर, तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा आत्मविश्वास मिळेल. आमच्या तज्ञ टीम शिक्षकाने प्रश्नोताराची अनेक भागांमध्ये विभागणी केली आहे, ज्यामुळे तुम्हाला हा पाठ अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. पुढील भागांवर एक नजर टाका:
- Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं (आकलन कृती)
- Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं (स्वमत)
- Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं (अतिरिक्त प्रश्नोत्तरे)
- Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं (शब्दार्थ)
- Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं (सामनार्थी शब्द)
- Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं (विरुद्धार्थी शब्द)
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं Summary in Marathi
जगणं कॅक्टसचं पाठपरिचय
‘जगणं कॅक्टसचं’ हा पाठ लेखक ‘वसंत शिरवाडकर’ यांनी लिहिला आहे. या पाठात लेखकाने वाळवंटी प्रदेशात उगवणाऱ्या ‘कॅक्टस’ या वनस्पतीची वैशिष्ट्ये, तिचे उपयोग, कमी पाण्यातही टिकून राहण्याची तिची क्षमता याचे सूक्ष्म वर्णन केले आहे.
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं Summary in English
“Jagna Cactus Che’ is written by Vasant Shirwadkar. He has explained the types of cactuses, their utility and adaptation to less amounts of water. He has offered detailed information about the cactus.
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं Exercises or questions answers: Question Bank
Question bank for Chapter 12.1 Jagan Cactusch:
जे विद्यार्थी वार्षिक परीक्षेची तयारी करत आहेत आणि बोर्डात अधिक गुण मिळवू इच्छितात ते आमच्या प्रश्न बँकेचा वापर करू शकतात, त्यापैकी काही प्रश्न तुमच्या अंतिम परीक्षेत निश्चितच विचारले जाऊ शकतात.
आमच्या pdf फाईलच्या शेवटी, तुम्हाला इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 12.1 " जगणं कॅक्टसचं " मिळेल. आमच्या तज्ञ टीमचा प्रश्न बँकेवर विश्वास आहे जे तुम्हाला अधिक गुण मिळविण्यात मदत करेल.
आमच्या शिक्षकांच्या तज्ञ टीमने या प्रश्नांसाठी सर्वोत्तम उत्तरे तयार केले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या PDF फाईलमध्ये दिली आहेत जी खाली दिली आहे. तुम्ही तुमच्या फावल्या वेळेत अभ्यास करण्यासाठी ते डाउनलोड करू शकता. इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 12.1 " जगणं कॅक्टसचं " च्या स्वाध्याय पीडीएफ फाइलमध्ये तुम्हाला खाली दिलेल्या महत्त्वाच्या प्रश्नपेढीचे निराकरण सापडेल.
आम्हाला आशा आहे की ही प्रश्न बँक तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या तयारीमध्ये थोडी मदत करेल.
Question Bank
प्रश्न 1.
‘निसर्ग हा मोठा जादूगार आहे’, हे विधान वाळवंटी प्रदेशाच्या संदर्भात कसे लागू पडते, ते पाठाच्या आधारे सविस्तर लिहा.
उत्तर:
‘जगणं कॅक्टसचं’ या पाठात ‘वसंत शिरवाडकर’ यांनी वाळवंटी प्रदेशातील कॅक्टसवर विशेष माहिती दिली आहे. निसर्ग हा मोठा जादूगार आहे हे पटवून दिले आहे. साधारणपणे पाण्याशिवाय वनस्पती जगू शकत नाही. वाळवंटात अगदीच थोडे पाणी मिळते. पण निसर्ग एक जादूगार आहे. त्या थोड्याशा पाण्यातही तो वनस्पती फुलवतो. तेथील प्राणी जगवतो.वाळवंटी प्रदेशातील खास अशी जीवसृष्टी आहे. वनस्पती व प्राणी तेथेही जगू शकतात. कॅक्टसच्या झाडांवरची लाल-पिवळी फुले चित्रमय वाटतात. वाळवंटातील जीवनसृष्टी हा खरोखर पृथ्वीवरचा एक चमत्कारच आहे. त्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीतही जीवसृष्टी निर्माण करणारा निसर्ग खरेच मोठा जादूगार आहे.
प्रश्न 2.
‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!’ या विधानाची यथार्थता लिहा.
उत्तरः
वाळवंटी प्रदेशात वर्षातून एखादाच पाऊस पडतो. कधी तर दोन-दोन, तीन-तीन वर्षे पावसाचा ठिकाणा नसतो, एरवी तेथे वाळवंटातसूर्यआगओकतअसतो.हवातापलेलीअसते.सूर्याच्या आगीमध्ये पाने, फुले, गवत करपून जातात. वाळवंटात ओसाड, भकास जीवन असते. कॅक्टस अवर्षणाचा प्रतिकार करणारा आहे. जे काही पाणी मिळेल तेवढे स्वत:मध्ये साठवून घ्यायचे आणि कोरड्या हंगामात अगदी मंद गतीने वाढत रहायचे. अशी कॅक्टसची जगण्याची किमया असते. सग्वारो कॅक्टस तर २०० वर्षे जगतो. कॅक्टसमध्ये पाणी साठवण्याची रचना असते.
मिळेल तेवढे पाणी तो साठवतो. त्याची सगळी अंगरचना पाणी साठवण्यासाठी बनलेली असते. पाऊस पडतो तेव्हा वाळवंटाची जमीन फारच थोडे पाणी शोषून घेते. त्यामुळे थोड्यावेळात पुष्कळ पाणी शोषून घेता येईल अशी कॅक्टसच्या मुळांची खास रचना असते. आपली मुळे लांब पसरवून भोवतालच्या जास्तीत जास्त क्षेत्रातील पाणी तो शोषून घेतो. झाडातले बरेचसे पाणी त्यांची पाने बाष्पीभवनाने गमावतात म्हणून कॅक्टसच्या झाडाने पान ही गोष्टच काढून टाकली आहे. म्हणूनच म्हटले आहे ‘थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!
प्रश्न 3.
टिपा लिहा.
उत्तरः
सग्वारो कॅक्टस वाळवंटी प्रदेशाचाअगदी खास प्रतिनिधी आहे. कॅक्टसच्या अनेक जातींमध्ये सग्वारो हा कॅक्टसचा राजा मानला जातो. तो ५० फूट उंचीपर्यंत वाढतो. त्याची वाढ मंद असते इतकी, की ५० वर्षात तो फक्त ३ फूट वाढतो आणि २०० वर्षे जगतो. सग्वारो कॅक्टसची फुले गेंदेदार असतात ही फुले फुलली की थोडा काळ तरी ओसाड वाळवंट सौंदर्यपूर्ण होते. सग्वारो कॅक्टसला फळे येतात. त्यातील गर कलिंगडासारखा असतो. सग्वारो कॅक्टस हात वर करून उभ्या राहिलेल्या एखाद्या मोठ्या बाहुल्यासारखा दिसतो. सम्वारो कॅक्टसचा उपयोग अमेरिकेतील रेड इंडियन करीत असत. अवर्षणाच्या काळात कॅक्टस चेचून ते त्याचे पाणी काढत आणि तहान शमवण्यासाठी हे पाणी पीत. सग्वारो फॅक्टसची फळे ही कलिंगडाच्या गरासारखी असल्याने खाण्यासाठी उपयोग होतो. फळाच्या गरात साखर घालून तो मोरावळ्यासारखा टिकवता येतो. रेड इंडियन लोकांचे हे ही एक खादय असते.
प्रश्न 4.
वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत, असे तुम्हाला वाटते ते लिहा.
उत्तरः
कॅक्टसच्या झाडामध्ये रसदार गर असतो, म्हणून त्यावर प्राण्यांच्या धाडी पडण्याचा धोका असतो. त्यासाठी खबरदारी म्हणून कॅक्टस झाडांच्या अंगावर धारदार बोचरे काटे पसरलेले असतात. वाळवंटी प्रदेशात बहुतेक झाडांना काटे असतात. त्याला खास कारण झाडे जनावरांनी ओरबाडून खाऊन टाकली तरी पाण्याची पंचाईत नसल्याने ती पुन्हा लवकर उगवून येतात. वाळवंटी प्रदेशात हे शक्य नाही. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे झाड एकदा गेले की गेले. यासाठी या प्रदेशातील झाडांना स्वत:च्या रक्षणासाठी काटे असतात.
प्रश्न 5.
‘पाणी हेच जीवन!’ या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा.
उत्तरः
पाण्याला समानार्थी शब्द ‘जीवन’ असा आहे. त्यावरून पाण्याचे अमूल्य महत्त्व लक्षात येते. जीवनात पाणी नसेल तर तहानेने व्याकूळ होऊन माणूस मरेल. स्वच्छता राहणार नाही. पशू-पक्षी, झाडे निसर्ग टिकणार नाही. सर्व सृष्टी उजाड होईल. वाळवंट, ओसाड राने तयार होतील. जीवसृष्टी राहणार नाही. जलचर प्राण्यांची सृष्टी नष्ट होईल. सूर्य आग ओकेल. जमिनीला मोठे तडे जातील. पाण्यावाचून हाहा:कार होईल. जीवनच संपुष्टात येईल. म्हणून पाण्याचा योग्य वापर करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
प्रश्न 6.
पाठाच्या आधारे कॅक्टसच्या प्रकारांची माहिती थोडक्यात लिहा.
उत्तरः
कॅक्टसच्या सुमारे १००० जाती आहेत. त्यातील अनेकांचे आकार मोठे चित्रविचित्र आहेत. ‘सायाळ’ कॅक्टस – कुंपणाच्या आश्रयाने राहणाऱ्या सायाळासारखा (शत्रुने हल्ला करताच काटे सोडणारा प्राणी) दिसतो.
(ii) ‘अस्वल’ कॅक्टस – हा कॅक्टस अस्वलासारखा दिसतो.
(iii) “पिंप’ कॅक्टस – हा कॅक्टस थेट पिंपासारखा दिसतो.
(iv) ‘सांबरशिंग’ कॅक्टस – ‘सांबरशिंग’ कॅक्टस सांबराच्या शिंगासारखा दिसणाऱ्या कॅक्टसला म्हणतात.
(v) सग्वारो कॅक्टस – सग्वारो कॅक्टस हा हात वर करून उभ्या राहिलेल्या एखादया मोठ्या बाहुल्यासारखा दिसतो. काही कॅक्टसना सुंदर फुले व रसदार फळे येतात. सग्वारो कॅक्टसला शेंड्यावर येणारी फुले पुष्कळशी फुलासारखी गेंदेदार असतात. ही फुले फुलली की थोडा काळ का होईना बिचाऱ्या ओसाड वाळवंटाला सौंदर्याला स्पर्श होतो. याला कॅक्टसचा राजा म्हणतात.
You May Like -
- Chapter 1 तू बुद्धी दे (प्रार्थना)
- Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव
- Chapter 2.2 संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता-संत एकनाथ
- Chapter 3 शाल
- Chapter 4 उपास
- Chapter 4.1 मोठे होत असलेल्या मुलांनो… (स्थूलवाचन)
- Chapter 5 दोन दिवस
- chapter 6 चुडीवाला
- Chapter 7 फूटप्रिन्टस
- Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर
- Chapter 9 औक्षण
- Chapter 10 रंग साहित्याचे
- Chapter 11 जंगल डायरी
- Chapter 12.1 जगणं कॅक्टसचं
Read This Also
- Class 10 Science Solutions
- Class 10th Maths Solutions
- Class 10 English Kumarbharti Solutions
- Class 10th Geography Solutions
- Class 10th History Solutions
- Class 10th Hindi Solutions