Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 16 स्वप्न करू साकार

Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 16 स्वप्न करू साकार

आम्ही विनामूल्य Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 16 स्वप्न करू साकार कृती | स्वाध्याय | प्रश्नोत्तर Pdf स्वरूपात प्रतुत करून देत आहोत. आपण जर Class 10th Marathi Aksharbharti Solutions | Digest च्या शोधात आहात तर तुह्मी योग्य ठीकानि आला आहात. आमच्या तज्ञ शिक्षकांच्या टीमने या पाठचा अभ्यास केला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना या पाठचा सारांश देण्यात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी नोट्स तयार केल्या आहेत. आम्ही तुम्हाला खात्री देतो की आमच्या पीडीएफ फाइल्स वापरून तुम्ही अधिक गुण मिळवू शकता. आम्ही तुम्हाला सांगू या की या प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या तज्ञ शिक्षक संघाने तयार केली आहेत. येथे तुम्हाला तीन पीडीएफ फाइल्स मिळतील, त्यापैकी पहिल्या पीडीएफ फाइल्समध्ये पाठ्यपुस्तकातील प्रश्नांची उत्तरे आहेत तर दुसऱ्या पीडीएफ फाइल्समध्ये तुम्हाला सरावांसाठी अतिरिक्त अतिरिक्त प्रश्न मिळतील. तिसर्‍या आणि शेवटच्या पीडीएफ फायलींमध्ये, तुम्हाला या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास मिळेल.

तुम्हाला माग्दर्शिका/गाईडची काळजी करण्याची गरज नाही कारण आमची पीडीएफ सोल्यूशन्स वापरल्यानंतर तुम्हाला त्यांची गरज भासणार नाही. या पोस्टच्या शेवटी तुम्हाला सर्व पीडीएफ फाइल्स मिळतील, म्हणून आम्ही तुम्हाला संपूर्ण लेख वाचण्याची विनंती करू इच्छितो.

Board ClassChapter
Maharashtra state Board10thChapter 16 स्वप्न करू साकार

Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 16 स्वप्न करू साकार questions answers in pdf format:

Questions and answers of class 10th Chapter 16 Swapn Kaqru Ssakar in Pdf

तुम्ही ज्याची वाट पाहत होता ते येथे तुम्हाला मिळेल. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी, आता तुम्हाला महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या इयता 10 वी मराठी अक्षरभारती विषयातील पाठ 16 ” स्वप्न करू साकार “ च्या pdf फाइल्स खाली सापडतील.
खाली तुम्ही PDF फाइल पाहू शकता जी डाउनलोड केली जाऊ शकते परंतु पुढे जाण्यापूर्वी, कृपया खाली दिलेल्या आमच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा.

Pdf file कशी डाऊनलोड करावी ?

खाली आपणास आमची pdf file दिसत आहे त्या खालील मेनू बटन देखील दिसत असेल. पुढील पेज बघण्यासाठी आपणास next बटन वर क्लिक करावे लागेल. अश्या प्रकारे आपण सर्व pdf file मधील प्रश्नोत्तरे बघू शकाल.

जर आपणांस खालील pdf फाईल डाऊनलोड करायची असेल तर Download Now या बटनावर क्लिक करावे लागेल. बटांवर क्लिक केल्या नंतर 15 सेकंदाचा वेळ थांबा. त्यानंतर आपणास प्रश्नोताराची pdf file डाऊनलोड करण्यास मिळेल.

Chapter-16-स्वप्न-करू-साकार


Do you want to download above file In pdf ?

Pdf फाईल डाऊनलोड करा


Download our Other Important PDF files ↴

Chapter 16 स्वप्न करू साकार - Text book Exercise


Chapter 16 स्वप्न करू साकार - Additional Extra Exercise:


Chapter 16 स्वप्न करू साकार - Entire Exercise:


Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 16 स्वप्न करू साकार : Pdf Download

Download Marathi class 10th Chapter 16 Swapn Karu Sakar pdf file

कधी- कधी काही तांत्रिक अडचणीचा विचार करता वरील दिलेल्या फाइल्स डाऊनलोड करत असताना काही अडचणी येवू शकतात.

आपणस जर वरील दिलेल्या Pdf फाइल्स डाऊनलोड करण्यास काही अडचणी येत असतील तर आपण खाली रकान्यात दिलेल्या Download बटनाला क्लिक करून मजकुराह डाऊनलोड करू शकता.

पाठाचे नाव मजकूर डाऊनलोड
Marathi Aksharbharti Solutions
Chapter 16 स्वप्न करू साकार
Text book ExerciseDownload
Download
Marathi Aksharbharti Solutions
Chapter 16 स्वप्न करू साकार
Additional Extra ExerciseDownload
Download
Marathi Aksharbharti Solutions
Chapter 16 स्वप्न करू साकार
Entire ExerciseDownload
Download

Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 16 स्वप्न करू साकार Summary|theme

Chapter 16 स्वप्न करू साकार भावार्थ

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

कवीने आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न सुंदरपणे रेखाटले आहे. कवी म्हणतात की, या देशाची माती, येथील संस्कृती, येथील परंपरा आम्हा भारतीयांची आहे. त्यावर फक्त आमचाच अधिकार आहे. मुळात भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा इथला भूमिपुत्र आहे. या शेतकऱ्याचा या मातीवर परंपरेपासून खरा अधिकार आहे. काळ्या मातीची मशागत करून धनधान्याची निर्मिती करणे व धरतीला सुजलाम् सुफलाम् करणे हे त्याचे कर्तव्यच आहे. त्यासाठी तो आयुष्यभर कष्ट करत असतो. त्याच्या कष्टातूनच कृषिसंस्कृती निर्माण होते. या कृषिसंस्कृतीमुळेच नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न साकार होत असते. म्हणूनच कवी म्हणतात की, येथील संस्कृती, येथील परंपरा यांचे जतन करून आपण सारेजण नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न साकार करूया.

फुलामुलांतून हसतो श्रावण

मातीचे हो मंगल तनमन

चैतन्याचे फिरे सुदर्शन

शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।

कवीने आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे सुंदर स्वप्न रेखाटतांना कृषिसंस्कृतीचे महत्त्व आपल्याला पटवून दिले आहे. कवी म्हणतात की, शेतकऱ्यांच्या कष्टांमुळेच फुलामुलांतून श्रावण हसत असतो. म्हणजेच श्रावण महिन्यामध्ये सारी धरती व तिची बाळे आनंदित होतात. खरे तर ऊनपावसाचा खेळ चालू असणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये धरती हिरव्या रानांनी, पाना–फुलांनी सजलेली असते. शेतकऱ्यांच्या मेहनतीने, कष्टाने इथली माती म्हणजेच इथली शेते धनधान्याने डोलू लागलेली असतात. धरतीचे हे सौंदर्य पाहून सगळे जण आनंदित होतात. चैतन्यमय, प्रसन्न वातावरण सर्वत्र निर्माण झालेले असते. ज्याप्रमाणे सुदर्शनचक्र फिरले की, दु:खाचा, अडचणींचा नाश होतो आणि सर्वत्र आनंद पसरतो, त्याचप्रमाणे शेतकरी जणू आपल्या कष्टाने चैतन्याचे, आनंदाचे सुदर्शनचक्र फिरवत असतो. त्याच्या मेहनतीमुळेच शेताशेतातून धान्यरूपी मोत्याचे ‘सुदर्शन’ आपल्याला घडते. त्याच्याबरोबर मेहनत करून आपणही या शेतातून, मातीमधून मोती म्हणजेच धान्यरूपी अपार धन पिकवूया. आपल्या धरतीला सुलजाम् सुफलाम् बनवूया.

या हातांनी यंत्र डोलते

श्रमशक्तीचे मंत्र बोलते

उदयोगाचे चक्र चालते

आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।।

भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे चित्र रेखाटताना कवी पुढे म्हणतात की, भारत हा कृषिप्रधान देश असला तरी इथे इतर उदयोगधंदेही चालतात. देशातील अनेक जण यंत्राच्या सहाय्याने काम करून उदयोगचक्रात मग्न आहेत. जसे शेतकरी, मजूर शेतात राबून शारीरिक कष्ट करत आहेत. तसेच अनेक कामगार यंत्रावर काम करत आहेत. त्यांच्या श्रमामुळे यंत्र डोलतात म्हणजेच यंत्र चालतात व प्रगतीची चाके फिरू लागतात. या यंत्रातून येणारा आवाज ऐकून कवीला असे वाटते, जणू हा नुसता आवाज नाही तर श्रमशक्तीचा मंत्र चालू आहे. कवी म्हणतात की, सारेजण श्रमशक्तीचा मंत्र जपत आहेत, म्हणजेच कष्ट करत आहेत व आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावत आहेत. उदयोगाचे हे चक्र सदैव चाललेलेच आहे. आपणही त्यामध्ये सहभागी होऊन नवनवे शोध लावूया. शेतीमध्ये नवेनवे बदल, नव्या सुधारणा आणून तसेच उद्योगक्षेत्रांमध्ये नव्या संकल्पना आणून आपली व आपल्या देशाची भरभराट करूया. तसेच नव्या उत्क्रांतीचा म्हणजे नव्या बदलांचा, नव्या शोधांचा, नव्या संकल्पनांचा सगळ्या आभाळावर ललकार घुमवूया म्हणजेच साऱ्या जगामध्ये नव्या गोष्टींचा जयजयकार करूया. सगळ्या जगभर हे नवे शोध, नव्या संकल्पना आपण आपल्या मेहनतीने पोहचवूया.

हजार आम्ही एकी बळकट

सर्वांचे हो एकच मनगट

शक्तीचीही झडते नौबत

घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।

कवीने आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजूटीचा मंत्र सांगितला आहे. एकजूटीचे सामर्थ्य पटवून देतांना कवी म्हणतात की, आमच्या देशात अनेक प्रकारची विविधता आहे. वेश, भाषा, धर्म, सण, खाणे अशी हजारो प्रकारची विविधता असली तरी आम्ही एकच आहोत. आमच्यातील एकता जराही कमी झालेली नाही. आम्ही भारतीय लोक देशाच्या विविध प्रांतात राहणारे असलो, वेगवेगळी भाषा बोलणारे जरी असलो, वेगवेगळे वेश परिधान करणारे जरी असलो तरी आम्ही एकजूटीने कार्य करणारे आहोत. त्यामुळे आमच्या हाताचे मनगट बलशाली, शक्तीशाली असेच आहे. याच एकजूटीने आपण आजवर अनेक कठीण प्रसंगावर मात केलेली आहे व पुढेही करत राहू. याच शक्तीने, एकीच्या बळाने आपल्या देशाची प्रगती होईल. शत्रूला धाक बसेल, शक्तीचे प्रदर्शन होईल तसेच एकात्मतेची भावना लोकांच्या मनात अजून वाढेल, जणू सर्वत्र शक्तीची नौबत झडेल. इथे जन्माला येणारे प्रत्येक बाळ तेजस्वी व प्रबळ असेल, देशाचे रक्षण करण्यासाठी, नवीन कार्यासाठी घराघरातून जणू नवी पिढी जन्म घेईल आणि आपल्या शक्तीतून, आपल्या कार्यातून आपल्या विजयाचा अवतार साऱ्या जगासमोर उभा करेल. म्हणजेच सामर्थ्यशाली बालके जन्मास येऊन देशाचे भविष्य नक्कीच उज्ज्वल करतील, असा एक आशावाद कवीने येथे मांडलेला आहे.

या विश्वाची विभव संपदा

जपू वाढवू आम्ही लाखदा

हस्त शुभंकर हवा एकदा

भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।

आपल्या भारत देशाला हजारो वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. आपली संस्कृती अतिप्राचीन व उच्च आहे. कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा तसेच एकजूटीचे सामर्थ्य या मूल्यांमुळे साऱ्या जगात आपल्या देशाने मानाचे स्थान संपादन केले आहे. म्हणून कवी म्हणतात की, आपल्या देशाची ही वैभवशाली संपदा आपण मनापासून जपू, तिचे रक्षण करू आणि तिच्यामध्ये चांगली भर घालून तिला वाढवू. त्यासाठीच कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा तसेच एकजूटीचे सामर्थ्य ही मूल्ये आपण मनापासून जपली पाहिजेत, या मूल्यांचा आदर वाढविणारा, आपल्या देशाच्या वैभवशाली संपदेला सांभाळणारा शुभंकर, कल्याणकारी हात मात्र हवा अशी इच्छा कवी व्यक्त करतात. त्यामुळे आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल होईल. तसेच सर्वत्र आपल्याच देशाचा जयजयकार होईल.

‌‌

Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 16 स्वप्न करू साकार : Notes

Class 10th Marathi Chapter 16 Swapn Karu Sakar notes:

आपण इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 16 " स्वप्न करू साकार " अध्ययन करत असताना, आपण पाहू शकतो की या पाठच्या मध्यंतरी बरेच प्रश्न विचारले जातात आणि विद्यार्थ्यांनी त्यांची उत्तरे देणे अपेक्षित असते. काही विद्यार्थ्यांना उत्तर देताना काही समस्या येऊ शकतात, परंतु आम्ही तुम्हाला वचन देतो की आमच्या उत्तराचे पुनरावलोकन केल्यानंतर, तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा आत्मविश्वास मिळेल. आमच्या तज्ञ टीम शिक्षकाने प्रश्नोताराची अनेक भागांमध्ये विभागणी केली आहे, ज्यामुळे तुम्हाला हा पाठ अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. पुढील भागांवर एक नजर टाका:

 • Chapter 16 स्वप्न करू साकार (आकलन कृती)
 • Chapter 16 स्वप्न करू साकार (स्वमत)
 • Chapter 16 स्वप्न करू साकार (अतिरिक्त प्रश्नोत्तरे)
 • Chapter 16 स्वप्न करू साकार (शब्दार्थ)
 • Chapter 16 स्वप्न करू साकार (सामनार्थी शब्द)
 • Chapter 16 स्वप्न करू साकार (विरुद्धार्थी शब्द)

Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 16 स्वप्न करू साकार Summary in Marathi

स्वप्न करू साकार काव्यपरिचय

‘स्वप्न करू साकार’ ही कविता ‘किशोर पाठक’ यांनी लिहिली आहे. या कवितेत कवीने श्रमाने मातीतून मोती पिकवू, एकजूटीने राहू व देशाचे भविष्य उज्ज्वल करू असा संदेश दिला आहे. कृषी व उदयोग जगतात क्रांती करण्याची प्रेरणा या कवितेतून मिळते.

Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 16 स्वप्न करू साकार Summary in English

With consolidated effort, we can have good quality grains. United endeavours can lead to the prosperous future of our country. This is the message given by the poet. The poem motivates us to strive for agricultural and industrial revolution.

Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 16 स्वप्न करू साकार Exercises or questions answers: Question Bank

Question bank for Chapter 16 Swapn Karu Sakar:

जे विद्यार्थी वार्षिक परीक्षेची तयारी करत आहेत आणि बोर्डात अधिक गुण मिळवू इच्छितात ते आमच्या प्रश्न बँकेचा वापर करू शकतात, त्यापैकी काही प्रश्न तुमच्या अंतिम परीक्षेत निश्चितच विचारले जाऊ शकतात.
आमच्या pdf फाईलच्या शेवटी, तुम्हाला इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 16 " स्वप्न करू साकार " मिळेल. आमच्या तज्ञ टीमचा प्रश्न बँकेवर विश्वास आहे जे तुम्हाला अधिक गुण मिळविण्यात मदत करेल.
आमच्या शिक्षकांच्या तज्ञ टीमने या प्रश्नांसाठी सर्वोत्तम उत्तरे तयार केले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या PDF फाईलमध्ये दिली आहेत जी खाली दिली आहे. तुम्ही तुमच्या फावल्या वेळेत अभ्यास करण्यासाठी ते डाउनलोड करू शकता. इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 16 " स्वप्न करू साकार " च्या स्वाध्याय पीडीएफ फाइलमध्ये तुम्हाला खाली दिलेल्या महत्त्वाच्या प्रश्नपेढीचे निराकरण सापडेल.
आम्हाला आशा आहे की ही प्रश्न बँक तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या तयारीमध्ये थोडी मदत करेल.

Question Bank

चौकट पूर्ण करा.

(i) फुलामुलांतून हसणारा – श्रावण

(ii) मातीचे मंगल – तनमन

(iii) चैतन्याचे – सुदर्शन

(iv) अपरंपार धन – शेतातील मोती

प्रश्न 3.

सहसंबंध लिहा.

(i) हजार आम्ही : एकी बळकट :: सर्वांचे हो : ………………………..

उत्तरः

एकच मनगट

प्रश्न 4.

कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

(i) नव्या पिढीचे, नव्या युगाचे ……………………….. करू साकार।। (स्वप्न, दिवास्वप्न, जग, पृथ्वी)

(ii) फुलामुलांतून हसतो ……………………….. मातीचे हो मंगल तनमन, (चैत्र, वैशाख, श्रावण, माघ)

(iii) उदयोगाचे चक्र चालते ……………………….. उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।। (धरतीवर, पाण्यावर, आभाळावर, हवेवर)

(iv) शक्तीचीही झडते ……………………….. घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।। (दौलत, नौबत, धनदौलत, पत)

(iv) ……………………….. शुभंकर हवा एकदा भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।। (हस्त, बाहू, पद, वद)

उत्तर:

(i) स्वप्न

(ii) श्रावण

(iii) आभाळावर

(iv) नौबत

(v) हस्त

प्रश्न 5.

जोड्या जुळवा.

उत्तर:

(1 – ई)

(ii- इ)

(iii – आ)

(iv – अ)

कृती २: आकलन कृती

प्रश्न 1.

ओघतक्ता पूर्ण करा.

प्रश्न 2.

एका वाक्यात उत्तरे लिहा.

(i) कवी कोणावर आमुचा अधिकार आहे असे म्हणतो?

उत्तरः

कवी या देशाच्या मातीवर आमुचा अधिकार आहे असे म्हणतो.

(ii) कवी शेतामधून काय पिकवायला सांगतात?

उत्तरः

कवी शेतामधून मोती पिकवायला सांगतात.

(iii) कवी उत्क्रांतीचा ललकार कोठे घुमवायला सांगतात?

उत्तरः

कवी आभाळावर उत्क्रांतीचा ललकार घुमवायला सांगतात.

प्रश्न 3.

काव्यपंक्तीचा योग्य क्रम लावा.

(i) भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।

(ii) घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।

(iii) आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।।

(iv) शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।

उत्तर:

(i) शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार ।।

(ii) आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।।

(iii) घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।

(iv) भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।

प्रश्न 4.

खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा.

(i) हक्क – अधिकार।

(ii) ऐश्वर्य – विभव।

प्रश्न 5.

‘श्रावण’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

उत्तर:

फुलांमुलांतून कोण हसतो?

कृती ३: कवितेतील शब्दांचा अर्थ

प्रश्न 1.

खालील कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा.

(i) देश

(ii) अधिकार

(iii) मंगल

(iv) चैतन्य

उत्तर:

(i) राष्ट्र

(ii) हक्क

(iii) पवित्र

(iv) उत्साह

प्रश्न २. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.

(१) प्रस्तुत कवितेचे कवी / कवयित्री:

किशोर पाठक

(२) प्रस्तुत कवितेचा विषयः

भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे.

(३) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ:

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

(४) प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश:

या देशाच्या मातीत आपण जन्म घेतला आहे. त्यामुळे हा देश आपला आहे. नवीन पिढीने, नवीन युगाने आपल्या देशात स्वत:च्याच प्रगतीचा विचार न करता देशाचाही विचार केला पाहिजे. देशाला प्रगतीपथावर नेण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे व ते एकतेने आणि जिद्दीने पूर्ण केले पाहिजे. याचाच अर्थ असा की, आपण श्रमाने मातीतून मोती पिकवू, उद्योग जगतात क्रांती करू, एकजूटीने राहू व देशाचे भविष्य उज्ज्वल करू असाच संदेश या कवितेतून मिळतो.

(४) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारण:

‘स्वप्न करू साकार’ ही कविता मला खूप आवडली आहे. त्याचे मुख्य कारण कवितेच्या सुरुवातीलाच कवीने नव्या पिढीच्या व नव्या युगाच्या मनात देशाप्रती आपलेपणाची भावना जागृत केलेली आहे. त्यानंतर या आपल्या देशाच्या उन्नतीसाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली आहे. पण केवळ प्रेरणा देऊनच ते थांबले नाहीत तर देशाच्या उन्नतीचा मार्गही म्हणजेच कृषिविकास, उदयोग क्षेत्रातील विकास, संस्कृतीचे जतन-संवर्धन त्यांनीच समजावून सांगितला आहे. त्यासाठी एकोप्याने काम करायला हवे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. हे सर्व आपण मनापासून केले तर नव्या पिढीचे. नव्या युगाचे आपल्या उज्ज्वल भारत देशाचे स्वप्न पूर्ण होईल असा सुंदर आशावाद त्यांनी मांडला आहे.

(६) प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ:

(i) धन – संपत्ती

(ii) श्रम – मेहनत, कष्ट

(iii) ललकार – जयघोष

(iv) बळकट – मजबूत

स्वाध्याय कृती

(२) या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तरः

‘स्वप्न करू साकार’ कवितेत कवी ‘किशोर पाठक’ यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रंगविले आहे. देशात नव्या पिढीचे आगमन होत आहे. नवे युग चालू आहे तेव्हा नवीन कल्पना, नवी उमेद आहे. कवीला देशाच्या मातीतून मोती पिकवायचे आहेत. भरघोस धान्याचे पिक घ्यायचे आहे. मातीचा कस सुधारायचा आहे. श्रावणसरींनी हसणाऱ्या, फुलणाऱ्या फुलांना व मुलांना पहायचे आहे. श्रमप्रतिष्ठेवर भर देऊन प्रयत्नांची कास धरायची आहे. औक्यौगिक प्रगती करायची आहे. एकोप्याने देशाची वैभव संपदा केवळ जपायचीच नाही तर वाढवायची आहे.

नव्या पिढीला श्रमशक्ती, यंत्र यांचा मंत्र क्यायचा आहे. देशासाठी झटणारे शुभंकर, कल्याणकारी हात तयार करायचे आहेत. देशाचे नाव उज्ज्वल करून सगळ्या जगात आपल्या देशाचा नावलौकिक वाढवायचा आहे.

You May Like -

 1. Chapter 1 तू बुद्धी दे (प्रार्थना)
 2. Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव
 3. Chapter 2.2 संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता-संत एकनाथ
 4. Chapter 3 शाल
 5. Chapter 4 उपास
 6. Chapter 4.1 मोठे होत असलेल्या मुलांनो… (स्थूलवाचन)
 7. Chapter 5 दोन दिवस
 8. chapter 6 चुडीवाला
 9. Chapter 7 फूटप्रिन्टस
 10. Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर
 11. Chapter 9 औक्षण
 12. Chapter 10 रंग साहित्याचे
 13. Chapter 11 जंगल डायरी
 14. Chapter 12 रंग मजेचे रंग उदयाचे
 15. Chapter 13 हिरवंगार झाडासारखं
 16. Chapter 16 स्वप्न करू साकार

Read This Also

Leave a Comment