
आम्ही विनामूल्य Maharashtra Board Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला कृती | स्वाध्याय | प्रश्नोत्तर Pdf स्वरूपात प्रतुत करून देत आहोत. आपण जर Class 10th Marathi Aksharbharti Solutions | Digest च्या शोधात आहात तर तुह्मी योग्य ठीकानि आला आहात. आमच्या तज्ञ शिक्षकांच्या टीमने या पाठचा अभ्यास केला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना या पाठचा सारांश देण्यात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी नोट्स तयार केल्या आहेत. आम्ही तुम्हाला खात्री देतो की आमच्या पीडीएफ फाइल्स वापरून तुम्ही अधिक गुण मिळवू शकता. आम्ही तुम्हाला सांगू या की या प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या तज्ञ शिक्षक संघाने तयार केली आहेत. येथे तुम्हाला तीन पीडीएफ फाइल्स मिळतील, त्यापैकी पहिल्या पीडीएफ फाइल्समध्ये पाठ्यपुस्तकातील प्रश्नांची उत्तरे आहेत तर दुसऱ्या पीडीएफ फाइल्समध्ये तुम्हाला सरावांसाठी अतिरिक्त अतिरिक्त प्रश्न मिळतील. तिसर्या आणि शेवटच्या पीडीएफ फायलींमध्ये, तुम्हाला या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास मिळेल.
तुम्हाला माग्दर्शिका/गाईडची काळजी करण्याची गरज नाही कारण आमची पीडीएफ सोल्यूशन्स वापरल्यानंतर तुम्हाला त्यांची गरज भासणार नाही. या पोस्टच्या शेवटी तुम्हाला सर्व पीडीएफ फाइल्स मिळतील, म्हणून आम्ही तुम्हाला संपूर्ण लेख वाचण्याची विनंती करू इच्छितो.
Board | Class | Chapter |
Maharashtra state Board | 10th | Chapter 8.1 जाता अस्ताला |
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला questions answers in pdf format:
Table of Contents
Questions and answers of class 10th Chapter 8.1 Jata Astala in Pdf
तुम्ही ज्याची वाट पाहत होता ते येथे तुम्हाला मिळेल. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी, आता तुम्हाला महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या इयता 10 वी मराठी अक्षरभारती विषयातील पाठ 8.1 ” जाता अस्ताला “ च्या pdf फाइल्स खाली सापडतील.
खाली तुम्ही PDF फाइल पाहू शकता जी डाउनलोड केली जाऊ शकते परंतु पुढे जाण्यापूर्वी, कृपया खाली दिलेल्या आमच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा.
Pdf file कशी डाऊनलोड करावी ?
खाली आपणास आमची pdf file दिसत आहे त्या खालील मेनू बटन देखील दिसत असेल. पुढील पेज बघण्यासाठी आपणास next बटन वर क्लिक करावे लागेल. अश्या प्रकारे आपण सर्व pdf file मधील प्रश्नोत्तरे बघू शकाल.
जर आपणांस खालील pdf फाईल डाऊनलोड करायची असेल तर “Download Now“ या बटनावर क्लिक करावे लागेल. बटांवर क्लिक केल्या नंतर 15 सेकंदाचा वेळ थांबा. त्यानंतर आपणास प्रश्नोताराची pdf file डाऊनलोड करण्यास मिळेल.
Chapter-8.1-जाता-अस्तालाDo you want to download above file In pdf ?
Pdf फाईल डाऊनलोड करा
Download our Other Important PDF files ↴
Chapter 8.1 जाता अस्ताला - Text book Exercise
Chapter 8.1 जाता अस्ताला - Additional Extra Exercise:
Chapter 8.1 जाता अस्ताला - Entire Exercise:
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला: Pdf Download
Download Marathi class 10th chapter 8.1 Jata Astala pdf file
कधी- कधी काही तांत्रिक अडचणीचा विचार करता वरील दिलेल्या फाइल्स डाऊनलोड करत असताना काही अडचणी येवू शकतात.
आपणस जर वरील दिलेल्या Pdf फाइल्स डाऊनलोड करण्यास काही अडचणी येत असतील तर आपण खाली रकान्यात दिलेल्या Download बटनाला क्लिक करून मजकुराह डाऊनलोड करू शकता.
पाठाचे नाव | मजकूर | डाऊनलोड |
Marathi Aksharbharti Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला | Text book Exercise | Download Download |
Marathi Aksharbharti Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला | Additional Extra Exercise | Download Download |
Marathi Aksharbharti Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला | Entire Exercise | Download Download |
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला Summary|theme
Chapter 8.1 जाता अस्ताला भावार्थ
जाता अस्ताला सूर्याचे
डोळे पाणावले
जाईन मी जर या विश्वाचे
होईल कैसे भले
सूर्य आपल्या प्रखर उष्णतेने संपूर्ण पृथ्वी प्रकाशित करून टाकतो. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत न थकता न दमता तो आपले कार्य करत असतो. म्हणजेच संपूर्ण पृथ्वीला प्रकाशमय करण्याची जबाबदारी सूर्याने उचललेली आहे. या सूर्याला पृथ्वीवरील प्रत्येक गोष्टीची काळजी आहे. तो कुटुंबाचा प्रमुख या नात्याने चिंतातुर आहे.
आपण अस्ताला जाणार तेव्हा ही पृथ्वी अंधारमय होईल, ही भीती या सूर्याला वाटत आहे. याच भीतीने व पृथ्वीच्या काळजीपोटी सूर्याचे डोळे पाणावले आहेत. सूर्याला वाईट वाटत आहे. माझ्यानंतर या विश्वाचे काय होईल? ही चिंता या सूर्याला लागलेली आहे. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा कुणी वाचवा या पृथ्वीला करा करा हो त्वरा मावळतीला चाललेल्या सूर्याला आपल्यानंतर या पृथ्वीचे काय होईल ही चिंता लागली आहे. आपण अस्ताला गेल्यानंतर लगेचच संपूर्ण पृथ्वी अंधारामध्ये बुडून जाईल असे सूर्याला वाटते. पृथ्वीची काळजी करणारे कोणीतरी असायला हवे, तिला कोणीतरी वाचवायला हवे असे सूर्याला वाटते. त्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा, त्वरेने यावे असे सूर्याला वाटते. आपला कोणीतरी उत्तराधिकारी असावा, आपले कार्य कोणीतरी थोड्याफार प्रमाणात उचलावे अशी सूर्याची आंतरिक इच्छा आहे.
कुणी न उठती
ये ना पुढती
कुणास ना शाश्वती
इकडे तिकडे बघत हळूचि
पणती ये पुढती
सूर्याच्या प्रचंड तेजाला दुसरा पर्यायच नाही. त्याच्यासारखा तोच! त्याची जागा कोण चालवील? त्याच्यासारखे प्रचंड कार्य कोणालाही जमणार नाही. या पृथ्वीतलावरील कोणीही सूर्याची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे कोणीही पुढे यायला तयार नाही कारण पृथ्वीवरील अंधार दूर करण्याची कोणाकडेच ताकद नाही.
तेवढ्यात हळू हळू मनाचे धाडस करत, इकडे तिकडे बघत एक पणती पुढे येते. खरे तर पणतीचा केवढा तो प्रकाश, पण ती पुढाकर घेते. अंधारल्या रात्री पृथ्वीवर थोडाफार प्रकाश देण्याची जबाबदारी ती स्विकारते. ती तेवढे धाडस दाखवते.
विनम्र भावे लवून म्हणे ती
तेजोमय भास्करा
मम तेजाने जमेल तैसी
उजळून टाकीन धरा
सूर्यापुढे आकाराने अगदीच लहान असणारी पणती सूर्याचे प्रचंड तेज जाणते आहे. त्याचा तेजोमय प्रकाश तिला माहीत आहे. त्याच्यापुढे आपण क्षुल्लक आहोत हेही तिला माहीत आहे. तरीही ती धाडस करते आणि अतिशय विनम्रपणे सूर्यदेवाला नमस्कार करून म्हणते, ”हे तेजोमय भास्करा, तुझ्याकडे प्रचंड तेज आहे. मी बापडी लहानशी. माझ्याकडेही प्रकाश आहे पण त्याची तुझ्याशी तुलना होऊच शकत नाही. मी माझ्याकडे असणाऱ्या थोड्याशा प्रकाशाने जेवढी जमेल तेवढी पृथ्वी उजळून टाकू शकते. माझा तेवढाच ’खारीचा वाटा’. माझ्यामुळे खूप मोठी प्रखरता निर्माण होणार नाही, परंतु अंधाराला छिद्र पाडण्याची ताकत माझ्यात आहे. तुझ्या जाण्याने तयार झालेला अंधार मी थोडाफार तरी भेदू शकते. पृथ्वी प्रकाशमय करण्याचे कार्य थोड्याफार प्रमाणात का होईना मी करू शकते”, तसे आश्वासन ती सूर्याला देते.
वच हे ऐकुनि त्या तेजाचे
डोळे ओलावले
तृप्त मनाने आणि रवि तो
झुकला अस्ताकडे
दैदिप्यमान असणाऱ्या सूर्यापुढे एवढीशी पणती बोलत होती. तिच्या बोलण्यात तेज होते. धाडस होते. आपण अस्ताला गेल्यानंतर आपले कार्य थोड्याफार प्रमाणात का होईना चालू राहील याची शाश्वती सूर्याला मिळाली. छोट्याशा पणतीचे हे धाडस पाहून सूर्याचे डोळे ओलावले, त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. आपल्यानंतर या पृथ्वीची काळजी घेणारे कोणीतरी आहे, या विचाराने तो तृप्त झाला. पृथ्वीमातेची काळजी घेण्याची जबाबदारी पणतीने उचलली आहे, या मनाला आनंद देणाऱ्या विचारातच सूर्य अस्ताकडे झुकला. सूर्य मावळला पण त्याचे कार्य सुरू राहिले. त्याचे प्रकाश देण्याचे कार्य थोड्याफार प्रमाणात का होईना पण पणती करत राहिली.
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला: Notes
Class 10th Marathi Chapter 8 Chapter 8.1 Chapter 8.1 Jata Astala notes:
आपण इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 8.1 " जाता अस्ताला " अध्ययन करत असताना, आपण पाहू शकतो की या पाठच्या मध्यंतरी बरेच प्रश्न विचारले जातात आणि विद्यार्थ्यांनी त्यांची उत्तरे देणे अपेक्षित असते. काही विद्यार्थ्यांना उत्तर देताना काही समस्या येऊ शकतात, परंतु आम्ही तुम्हाला वचन देतो की आमच्या उत्तराचे पुनरावलोकन केल्यानंतर, तुम्हाला अशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा आत्मविश्वास मिळेल. आमच्या तज्ञ टीम शिक्षकाने प्रश्नोताराची अनेक भागांमध्ये विभागणी केली आहे, ज्यामुळे तुम्हाला हा पाठ अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. पुढील भागांवर एक नजर टाका:
- Chapter 8.1 जाता अस्ताला (आकलन कृती)
- Chapter 8.1 जाता अस्ताला (स्वमत)
- Chapter 8.1 जाता अस्ताला (अतिरिक्त प्रश्नोत्तरे)
- Chapter 8.1 जाता अस्ताला (शब्दार्थ)
- Chapter 8.1 जाता अस्ताला (सामनार्थी शब्द)
- Chapter 8.1 जाता अस्ताला (विरुद्धार्थी शब्द)
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला Summary in Marathi
‘जाता अस्ताला’ ही कविता ’गुरूदेव रविंद्रनाथ टागोर’ यांनी लिहिली आहे. मुळात बंगाली कवितेचे मराठीत स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे . या कवितेत टागोर यांनी सूर्य आणि पणतीच्या प्रतीकांद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितले आहे.
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला Summary in English
This is a translation of a poem (originally written by Rabindranath Tagore in Bengali) by Shyamala Kulkarni. The poem is a comparison between the sun and a small lamp both of which give light to the world. In this own way, the lamp is small yet spreads light to the world. Its is beautifully shown how small creatures or things have the capacity to make a world beautiful.
Class 10 Marathi Aksharbharti Solutions Chapter 8.1 जाता अस्ताला Exercises or questions answers: Question Bank
Question bank for Chapter 8.1 Jata Astala:
जे विद्यार्थी वार्षिक परीक्षेची तयारी करत आहेत आणि बोर्डात अधिक गुण मिळवू इच्छितात ते आमच्या प्रश्न बँकेचा वापर करू शकतात, त्यापैकी काही प्रश्न तुमच्या अंतिम परीक्षेत निश्चितच विचारले जाऊ शकतात.
आमच्या pdf फाईलच्या शेवटी, तुम्हाला इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 8.1 " जाता अस्ताला " मिळेल. आमच्या तज्ञ टीमचा प्रश्न बँकेवर विश्वास आहे जे तुम्हाला अधिक गुण मिळविण्यात मदत करेल.
आमच्या शिक्षकांच्या तज्ञ टीमने या प्रश्नांसाठी सर्वोत्तम उत्तरे तयार केले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या PDF फाईलमध्ये दिली आहेत जी खाली दिली आहे. तुम्ही तुमच्या फावल्या वेळेत अभ्यास करण्यासाठी ते डाउनलोड करू शकता. इयत्ता 10 वी मराठी अक्षरभारती पाठ 8.1 " जाता अस्ताला " च्या स्वाध्याय पीडीएफ फाइलमध्ये तुम्हाला खाली दिलेल्या महत्त्वाच्या प्रश्नपेढीचे निराकरण सापडेल.
आम्हाला आशा आहे की ही प्रश्न बँक तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या तयारीमध्ये थोडी मदत करेल.
Question Bank
सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
उत्तरः
सूर्य : पणती, तू खरचं खूप चांगली आहेस. तुझ्याजवळ माझ्याइतका झगझगीत प्रकाश नाही. तरी पण माझ्या अनुपस्थितीत पृथ्वीला प्रकाश देण्याचं काम स्विकारलयं याबद्दल खरचं तुझं खूप कौतुक वाटतं मला!
पणती : हे भास्करा, या पृथ्वीवरील जीवांसाठी, सृष्टीसाठी तू सतत कार्यरत असतोस. तू नसतास तर ही सृष्टी, तिचे अस्तित्व राहिलेच नसते. धरेसाठीची तुझी व्याकूळता मला समजू शकते म्हणूनच माझ्याजवळ जेवढा प्रकाश आहे त्याने मला जे काही करणे शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करीन.
सूर्य : तू इतकी छोटी असूनही इतका मोठा विचार करतेस खरेच तुझे खूप आभार. पृथ्वीवरचा सगळ्यात प्रगत जीव म्हणजे मानव हा मात्र पृथ्वीच्या अस्तित्वाचा, पर्यावरणाचा अजिबात विचार करत नाही. विकासाच्या नावाखाली त्याने माझ्या सुंदर धरेचा नाश करायला सुरुवात केली आहे. तिला विदृप केले आहे. म्हणून मला खूप कळजी वाटते.
पणती : तुझी काळजी अगदीच योग्य आहे सूर्यदेवा. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशाप्रकारे मानव वागतो आहे. आपल्या स्वार्थासाठी निसर्गाला तो अक्षरश: ओरबाडतो आहे.
सूर्य : हो ना! याच गोष्टीचा मला खूप त्रास होतो. रोज सकाळी जेव्हा पृथ्वीला उजळून टाकण्यासाठी मी येतो आणि तो पक्ष्यांचा किलबिलाट, खळाळून वाहणारे झरे, दया; डोंगर, शेते, वाळवंट, दलदली, वृक्ष, वन हे सारं जेव्हा मी बघतो, त्यावेळी मन हेलावतं हे सगळं खरंच एक दिवस नष्ट पावणार का?
पणती : हे रविराजा, इतकं चिंतीत होण्याची गरज नाही कारण आता मानवालाही या गोष्टीची जाणीव झाली आहे. तू निर्माण केलेलं हे पृथ्वीरत्न तो सांभाळण्यासाठी आता धडपडतो आहे.
सूर्य : खरचं किती आशावादी आहेस तू. मानव वेळीच जागरूक झाला आहे, हे ऐकून मला खूप बरं वाटलं. अशा आशावादी विचारांची, सहृदय माणसे जर एकत्र आली तर तो दिवस नक्कीच दूर नाही. ज्या दिवशी ही वसुंधरा पूर्वीसारखी सुजलाम् सुफलाम् व रमणीय होईल.
पणती : नक्कीच होईल, कारण आता बरीच माणसे आपापल्या परीने पर्यावरणाबद्दल काम करीत आहेत. पर्यावरणाची चळवळ सर्वत्र जोर धरत आहे. सकारात्मक विचारांची माणसे एकत्र येऊन काम करत आहेत.
सूर्य : अरे व्वा! असं होत असेल तर फारच उत्तम. जे सुंदर आहे ते सुंदरच कसे राहील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. शिवाय प्रत्येकाने ‘जगा आणि जगू क्या’, हा निसर्गाचा नियम पाळला, तर ज्याच्या त्याच्या क्रमाने जीवनक्रम सुरू राहील आणि मग ही सृष्टी निर्मळतेने भरून जाईल.
You May Like -
- Chapter 1 तू बुद्धी दे (प्रार्थना)
- Chapter 2.1 संतवाणी अंकिला मी दास तुझा-संत नामदेव
- Chapter 2.2 संतवाणी योगी सर्वकाळ सुखदाता-संत एकनाथ
- Chapter 3 शाल
- Chapter 4 उपास
- Chapter 4.1 मोठे होत असलेल्या मुलांनो… (स्थूलवाचन)
- Chapter 5 दोन दिवस
- chapter 6 चुडीवाला
- Chapter 7 फूटप्रिन्टस
- Chapter 8 ऊर्जाशक्तीचा जागर
- Chapter 8.1 जाता अस्ताला
Read This Also
- Class 10 Science Solutions
- Class 10th Maths Solutions
- Class 10 English Kumarbharti Solutions
- Class 10th Geography Solutions
- Class 10th History Solutions
- Class 10th Hindi Solutions